'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान

Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

राजीव कासले | Updated: May 17, 2024, 09:02 PM IST
'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान title=

Loksabha India Sabha : मुंबईतल्या बीकेसीवर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) हल्लाबोल केला. शिवाजी पार्कात चार जूनपर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिलेत. कारण चार जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी आपल्या फसवलं, नोटबंदी जाहीर केली. त्याला डिमॉनिटाजेशन म्हणतात. तसंच मोदीजी तुम्ही पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आला आहात, बोलून घ्या, कारण चार जूनला संपूर्ण देश तुम्हाला 'डीमोदीनेशन' करणार आहे. जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

तसं पाहिलं तर ही प्रचाराची सांगता सभा आहे, आणि आपल्या विजयाची नांदी ठरणारी ही विराट जनसभा आहे. आज मुंबईत दोन सभा होतायत, एका बाजूला आपण सगळे असली आहात, आणि दुसऱ्या बाजूला सर्व गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सर्व बेअकली आणि नकली. त्यांच्याकड सर्व भाडोत्री माणसं आहेत, वक्ते भाडोत्री, उमेदवारी भाडोत्री आणि माणसंही भाड्याने आणलीत. सर्व भाडखाऊ तिथे गेलेत असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसला आहे, तिकडे ना मोदी जायला तयार ना अमित शहा जायला तयार. पण ते सोडून भाडोत्रींची सर्व फौज घेऊन मोदी मुंबईत उद्धव ठाकरेंना संपवायला आले आहेत, संपवून बघा, मी आव्हान देतो मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करा,  हा महाष्ट्र तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहाणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय. हा शाहु, फुले आंबेजकरांचा महाराष्ट्र आहे. हा शाहा, अदाणी, मोदींचा महाराष्ट्र आम्ही कधीही होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा. माझा मर्द मराठा एकसुद्धा फुटणार नाही. 

तुम्ही गद्दार घेताय घ्या, सडलेली पानं ही झडलीच पाहिजे ही निसर्गाचा नियम आहे. आज शिवसेनेच्या वृक्षावरची सडलेली पानं तिकडे गेली आहेत. यंदा पहिल्यांदा असं झालं की पीएम मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशाच सापडत नाहीए. माझ्या घराणेशाहीचा मुद्दा काढला गेला. मोदीजी तुम्ही कोणत्या घराण्याचे आहात माहित नाही, कोणाचे संस्कार आहेत माहित नाही, माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीत औरंगजेब जन्माला आला असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.