लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 08:10 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.

या निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी दिली आहे. पूनम महाजन यांचा सामना काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी आहे.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १,८६,७७१ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

पूनम महाजन भाजप ४,७८,५३५
प्रिया दत्त काँग्रेस २,९१,७६४
फिरोझ पालखीवाला आप ३४,८२४
आनंद शिंदे बसपा १०,१२८
अबू आझमी सपा ९,८७३

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x