दिवाळीत यंदा प्रदुषणाची पातळी कमी

आता बातमी मुंबईकरांचं अभिनंदन करणारी...कारण मुंबईत गेल्या  १५ वर्षात दिवाळीतील सर्वाधिक कमी ध्वनी प्रदुषणाची नोंद यंदा करण्यात आलीय. 

Updated: Oct 29, 2019, 12:05 AM IST
दिवाळीत यंदा प्रदुषणाची पातळी कमी title=

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : आता बातमी मुंबईकरांचं अभिनंदन करणारी...कारण मुंबईत गेल्या  १५ वर्षात दिवाळीतील सर्वाधिक कमी ध्वनी प्रदुषणाची नोंद यंदा करण्यात आलीय. 

मुंबईकरांनो तुमचं अभिनंदन.. यंदा दिवाळीत पर्यावरणाचं भान राखत  फटाके उडवलेत.यंदा मुंबईत 112 डेसीबल ही सर्वाधिक फटाक्यांच्या आवाजाची नोंद झालीय. जी गेल्या 15 वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. 

गेल्यावर्षीपर्यंत हाच फटाक्यांचा आवाज तब्बल 145 डेसीबलपर्यंत होता. नवी मुंबई वगळता मुंबई शहर, उपनगरात प्रदुषणाची वातळी दरवर्षीच्या तुलनेत वाढलेली नाही. 

फटाक्यांचा आवाज यंदा कमी झालाय, असं मुंबईकरांनाही वाटतंय. एकीकडे दिल्ली फटाक्यांच्या प्रदूषणामुळे गुदमरलेली असताना मुंबईकरांनी सूज्ञपणा दाखवलाय, याचं कौतुक.