मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचं वाटप

मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान पर्दाफाश केला आहे. फाटलेलं दप्तर, तुटलेले टिफीन बॉक्स पालिका सभागृहात आणून पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

Updated: Sep 27, 2017, 10:29 AM IST
मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचं वाटप title=

मुंबई : मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान पर्दाफाश केला आहे. फाटलेलं दप्तर, तुटलेले टिफीन बॉक्स पालिका सभागृहात आणून पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

त्यानंतर इतर पक्षाच्या नगरसेवकांनीही पालिकेच्या शिक्षण विभागावर तोंडसुख घेतलं. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या 27 शालेय वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून पालिका यावर खर्च करत असलेले कोट्यवधी रुपये जातात कुठे असा सवाल सईदा खान यांनी केला आहे.