मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
काल मंत्रालयात शेतकरी कर्जमाफीबाबत पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. यामुळे ही शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया आता दिवाळीपर्यत पुढे ढकलली गेली असून कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्या आधी शेतक-यांचे तोंड गोड करू असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले आहे.
ज्या जिल्ह्यांची माहिती आधी येईल आणि छाणनी पूर्ण होईल त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळतील असे सहकार आणि पणन मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यात २ ऑक्टोबरपर्यंत गावापातळीवरील चावडीवाचन पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.