CNG-PNG Price Increases : महागाईचा भडका! सिलेंडरनंतर आता सीएनजी आणि पीएनजीही महाग

CNG-PNG Price Increases : सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 

Updated: Jul 12, 2022, 07:46 PM IST
CNG-PNG Price Increases : महागाईचा भडका! सिलेंडरनंतर आता सीएनजी आणि पीएनजीही महाग title=

मुंबई :  सर्वसामांन्यांना आणखी एक झटका देणारी बातमी आहे. प्रामुख्याने सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. (mahanagar gas hike cng prices 4 rupees and png 3 rupees new rate will be aplicable to today midnight)

सीएनजी 4 तर पीएनजी 3 रुपयांनी महाग झालंय. या दरवाढीमुळे आता पीएनजीचे नवे दर हे 48 रुपये 50 पैसे, तर सीएनजी 80 रुपये प्रति किलो असणार आहे. या वाढीव दरांमुळे आता सर्वसामांन्याना खिसा आणखी हलका करावा लागणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात  50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ बसला आहे. 

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेटवर याचा परिणाम झाला आहे. सिलेंडरचे दर वाढल्याने आता घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत ही 1 हजार 53 रुपये इतकी झाली आहे.