महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार - महापौर

6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार आहे. 

Updated: Dec 2, 2021, 01:34 PM IST
महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार - महापौर title=
संग्रहित छाया

मुंबई : 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार आहे. आंबेडकरी अनुयायी यांची सर्व व्यवस्था महानगरपालिका करणार आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील अनुयायांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आवाहन केले आहे की, त्यांनी ऑनलाइन अभिवादन करावे. बाहेरून येणारी लोक पाहता कोविड नियमांचे पालन करावे. फार गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रोनचेही संकट समोर आहे. ऑनलाइन अभिवादन दिवसभर सुरू राहणार आहे. महानगरपालिका सज्ज आहे, असे महापौर म्हणाल्या.

ओमायक्रोनचे संकट पाहता सर्वांनी सतर्क राहावे. प्रत्येकाने काळजी घ्यावी. ओमायक्रोनचे संकट गंभीरतेने घ्यावं लागेल. मुंबईत दररोज चार फ्लाईट येतात त्यात 2 हजार प्रवासी दररोज येतात. काही परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी काही लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांचे जिनोम सिक्वेन्सीग आपण पाठवले आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नायरमधील डॉक्टरांची चौकशी होणार होणार आहे. आपण नायर हॉस्पिटलला 1.15 वाजता जाणार आहे. डॉक्टरांनी निर्दयी होऊ नये, असे त्या म्हणाल्या.