महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला... अगदी रुग्णालयातल्या बेडवर बसूनही... 

Updated: Nov 26, 2019, 11:19 PM IST
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 'मॅन ऑफ द मॅच'... संजय राऊत!  title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय सामन्यात महाविकास आघाडीनं बाजी मारलीय. या राजकीय सामन्यात संजय राऊतांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळं या मॅचचे 'मॅन ऑफ द मॅच' संजय राऊतच ठरतील. महाराष्ट्रातला राजकीय सामना एखाद्या क्रिकेट मॅचपेक्षा कमी नव्हता. शेवटच्या चेंडूवर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणातही गेल्या महिनाभरापासून रोमहर्षक सामना सुरू आहे. या सामन्यात सर्वात भन्नाट बोलंदाजी केली संजय राऊतांनी.

उद्धव ठाकरे नव्या सरकारचे कॅप्टन व्हावेत यासाठी संजय राऊतांनी भाजपाविरोधात तुफान बॉलिंग केली. त्यांचे एक एक बाऊंसर असे होते की ज्यामुळं भाजपाची भंबेरी उडायची. शेवटी आता तरी संजय राऊतांनी गप्प बसावं असं म्हणायची वेळ भाजपावर आली. यासाठी भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांनाच टार्गेट केलं. परंतु, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला... अगदी रुग्णालयातल्या बेडवर बसूनही... 

रुग्णालयातल्या बेडवर बसूनही संजय राऊत यांची लेखणी सुरूच
फाईल फोटो - रुग्णालयातल्या बेडवर बसून 'सामना'साठी अग्रलेख लिहिताना संजय राऊत

रुग्णालयातल्या बेडवर बसूनही संजय राऊत यांची लेखणी सुरूच

टिच्चून खेळतो तोच खरा खेळाडू.... संजय राऊतांनी शिवसेनेसाठी बॅटिंगही केली. महाविकास आघाडीसाठी फिल्डिंगही लावली आणि भाजपाविरोधात बॉलिंगही केली. रिटायर्ड हर्ट होऊन दोन दिवस हॉस्पिटलमध्येही राहिले, पण पुन्हा येऊन मैदान गाजवलं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या या मॅचचे तेच खरे 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x