राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचं पत्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि वर्कींग कमिटी सदस्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असं पत्र पाठवलं आहे. 

Updated: Dec 3, 2017, 07:58 PM IST
राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचं पत्र title=

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि वर्कींग कमिटी सदस्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असं पत्र पाठवलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, पंतगराव कदम यांच्यासह अन्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी त्यावर अनुमोदनपर सही केली आहे.

उद्या राहुल गांधी यांची राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष निवडणूक पदाबाबत अर्ज दाखल करतील अशी माहिती सुशील कुमार शिंदे यांनी दिली.