Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, मुंबईत कहर सुरुच

देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना नावाची पनवती (Maharashtra Corona Update) थांबण्याचं नाव घेत नाहीये. 

Updated: Jun 18, 2022, 08:57 PM IST
Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, मुंबईत कहर सुरुच title=

मुंबई : देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना नावाची पनवती (Maharashtra Corona Update) थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होतेय. तसेच दररोज काहींचा मृत्यूही होतोय. तर सातत्याने मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित सापडतायेत. त्यामुळे कुठेतरी राज्यावर कोरोना निर्बंध लागण्याी शक्यता नाकारता येत नाही. (maharashtra corona update 18 june 2022 today 3 thousand 883 positive patients found in state know how many patietns in mumbai)

राज्यात आज (18 जून) 3 हजार 883 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर मुंबईत 2 हजार 54 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. वाढत्या रूग्णसंख्येनं राज्याची चिंता वाढलीय.

जूनमध्ये असा वाढला संसर्ग

शनिवार 18 जून : 3 हजार 883

शुक्रवार 17 जून : 4 हजार 165

गुरुवार 16 जून :  4 हजार 255

बुधवार 15 जून : 4 हजार 24

मंगळवार 14 जून : 2 हजार 956 

सोमवार 13 जून : 1 हजार 885

रविवार 12 जून :  2 हजार 946   

शनिवार 11 जून : 2 हजार 922

शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81 

गुरुवार 9 जून : 2 हजार 813 

बुधवार 8 जून :  2 हजार 701 

मंगळवार 7 जून : 1 हजार 881 

सोमवार 6 जून :  1 हजार 36  

रविवार 5 जून : 1 हजार 494

शनिवार 4 जून :  1 हजार 357

शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 

गुरुवार 2 जून : 1 हजार 45

बुधवार 1 जून : 1 हजार 81