मुंबई : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) विस्फोट झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत राज्यात आज 9 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज म्हणजेच गुरुवारी एकूण 36 हजार 265 कोरोना रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचे 79 रुग्ण आढळले आहेत. बुधवारी राज्यात 26 हजार 538 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.(maharashtra corona update today 6 january 36 thousand 265 corona patients and 79 omicrone patients found in state)
किती रुग्ण बरे झाले?
दिवसभरात एकूण 8 हजार 907 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.17 इतका झाला आहे.
राज्यात किती जणांचा मृत्यू?
दिवसभरात कोरोनामुळे 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर हा 2.08 इतका आहे.
मुंबईत विक्रमी रुग्णसंख्या
मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर धारावीत 107 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसह महापालिकेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण किती?
राज्यात ओमायक्रॉनचे दिवसभरात 79 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. राज्यातील 79 पैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात एकूण ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 876 इतका झाला आहे.