Amruta Fadnavis New Song : "लेकर आ रही हूँ...", अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवं कोर गाणं (Amruta Fadnvis New Song) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Jul 15, 2022, 06:57 PM IST
Amruta Fadnavis New Song : "लेकर आ रही हूँ...", अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातून. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवं कोर गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या गाण्याबाबत उत्सूकता लागून राहिली आहे.  (maharashtra dcm devendra fadnvis wife amruta fadnvis new song coming soon)

अमृता फडणवीस यांच्या ट्विटमध्ये काय? 

अमृता फडणवीस याचं 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस  यांनी ट्वीट करत या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. "लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना! असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच

 

अमृता फडणवीस यांची आतापर्यंत गायलेली गाणी

श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेल्या 'मानिके मागे हिते' या गाण्यावर आधारित ‘मन ही मन तुझे चाहा…’ 

‘अलग मेरा ये रंग है’

'गणेश वंदना' 

"तिला जगू द्या..."

‘तू मंदिर, तू शिवाला’