मुंबई : येत्या 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील नऊ महिने हे पद रिक्त आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदानाने व्हावी यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. या नियमाला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूरी घेतली जाणार आहे. त्यानंतर 23 किंवा 24 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करून एका दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला जाणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत मत फुटण्याच्या प्रकार घडला होता. तसाच प्रकार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. त्यामुळं थेट विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. महाविकास आघाडीकडे 288 पैकी 170 संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 इतकं संख्याबळ आहे.