ठाणे : मुंबईजवळ ठाण्यातील एका बिल्डरच्या कार्यालयातून 12 हजार जिलेटिन स्टिक्स आणि 3 हजार 8 डिटोनेटर जप्त केले आहेत. ठाणे गुन्हे शाखेने मित्तल एंटरप्रायझेस या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून हा सगळा माल जप्त केला आहे. कंपनीच्या सेफ हाऊस कार्यालयात ही स्फोटके ठेवण्यात आली होती. काल रात्री म्हाणजे सोमवारी दीड वाजता पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे.
आरोपींनी संगितले की, या स्फोटकांचा वापर इमारतीच्या कामासाठी केला जातो, परंतु इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी हे स्फोटके का ठेवल? याचा तपास केला जात आहे. भिवंडी कोर्टाने आरोपींला 22 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी सांगितले की, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटला एक गुप्त माहिती मिळाली, ज्यामुळे चिंचोटी रोडवरील या कंपनीच्या आवारात त्यांनी छापा टाकला.
कोकणी म्हणाले की, 63 बॉक्समध्ये सापडलेल्या 12 हजार जिलेटिनच्या स्टिक्स आणि 4 बॉक्समध्ये 3 हजार 8 डिटोनेटर जप्त केले आहेत. या सगळ्यांची किंमत 2 लाख 42 हजार 600 रुपये आहे. कोणत्याही मंजुरीशिवाय अशी सामग्री बाळगल्याने या कंपनीचे मालक गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे यांना भारतीय दंड संहिता आणि विस्फोटक कायद्यांतर्गत अटक केली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भिवंडीतील भोईवाड़ा पुलिस या सगळ्या प्रकणाचा तपास करत आहे. हे जिलेटिन स्टिक्स आणि स्फोटके कोठून घेण्यात आले आणि हे साहित्य येथे का ठेवले गेले? याचा शोध घेण्याचा देखील पोलिस प्रयत्न करत आहेत.