फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Updated: Jun 16, 2019, 10:17 PM IST
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर title=

मुंबई : फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. विनोद तावडे यांचं शालेय शिक्षणमंत्री पद आता आशिष शेलार यांना देण्यात आलं आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खातं दिलं आहे.

विनोद तावडे यांचं याआधीच वैद्यकीय शिक्षण खातं काढून घेण्यात आलं होतं. आता शालेय शिक्षण आणि क्रीडा खातंही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे. तर विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना प्रकाश मेहता यांच्यावर एमपी मिल कपाऊंड एसआरए प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मेहता यांच्याकडील हे खातं आता विखे पाटील यांना देण्यात आलं आहे.

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप

कॅबिनेट मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील- गृहनिर्माण

आशिष शेलार- शालेय शिक्षण, क्रीडा व युवा कल्याण

संजय कुटे- कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग कल्याण

सुरेश खाडे- सामाजिक न्याय  

डॉ. अनिल बोंडे- कृषी

डॉ. अशोक उईके- आदिवासी विकास

जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)- रोजगार हमी व फलोत्पादन

तानाजी सावंत (शिवसेना)- जलसंधारण

राम शिंदे- पणन व वस्त्रोद्योग

संभाजी पाटील निलंगेकर- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण

जयकुमार रावल- अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

सुभाष देशमुख- सहकार, मतद व पुनर्वसन

राज्यमंत्री

योगेश सागर- नगरविकास

अतुल सावे- उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

संजय उर्फ बाळा भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन 

परिणय फुके- सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास 

अविनाश महातेकर- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य