MBBS च्या जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे मागणी - गिरीश महाजन

राज्यात भविष्यात MBBS च्या जागा वाढणार असल्याची माहिती

Updated: Jun 19, 2019, 02:45 PM IST
MBBS च्या जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे मागणी - गिरीश महाजन title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यात भविष्यात MBBS प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहेत. राज्याने केंद्र सरकाकडे अधिक जागांची मागणी केली असून एक वर्षाच्या आत याबाबात निर्णय होईल अशी आशा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. विधानपरिषदमध्ये लक्षवेधी प्रश्नाद्वारे हेमंत टकले यांनी मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाच्या घोळाचा प्रश्न उपस्थित केला होता. 

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासंदर्भात राज्य सरकारने सर्व खबरदारी घेत पावले उचचली असून येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निकाल लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडे वैद्यकीय पदव्युत्तरासाठी जागा वाढवून देण्याची मागणी केली असून MBBS च्याही २००० जागा वाढवून देण्याची मागणी केल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारच्या ही मागणी मान्य झाली तर मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांबाबत असेलेले आऱक्षण लागू करता येईल. पण त्यापेक्षा आरक्षणाची टक्केवारी वाढल्यानं अनेकांना प्रवेश मिळणार नाही. अशी भिती व्यक्त होत असतांना आता आरक्षणाबाहेर राहिलेल्यांना सुद्धा वैद्यकीय प्रवेशाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.