Anganwadi Workers Salary : अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज, अखेर तो प्रस्ताव आलाच

अंगणवाडी सेविकांच्या या मागणीबाबत महिला आणि बालविकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.   

संजय पाटील | Updated: Oct 10, 2022, 05:15 PM IST
Anganwadi Workers Salary : अंगणवाडी सेविकांसाठी  गुडन्यूज, अखेर तो प्रस्ताव आलाच title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika) मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मानधनवाढ (Anganwadi Sevika Salary) करण्यात यावी, अशी अंगणवाडी सेविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांच्या या मागणीबाबत महिला आणि बालविकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (maharashtra government hikes anganwadi workers honorarium proposal)

"अंगणवाडी सेविकांची मानधनात वाढ करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मानधन वाढीबाबतचा निर्णय काही दिवसात घेतला जाईल. या मानधन वाढीच्या प्रस्तवाची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे", अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली. सरकारने मानधनवाढीचा निर्णय घेतल्यास राज्यातील दीड लाख अंगणसेविकांना याचा फायदा मिळेल. 

दरम्यान मंगल प्रभात लोढा पालकमंत्री आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील पालिकेच्या प्रभाग कार्यालयाला भेट देत आहेत. सर्वसामांन्यांच्या तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या निमित्ताने केला जात आहे.