मुंबई : शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाचे निकालात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, याचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी निकाल स्पष्ट होण्यास संध्याकाळचे ७ वाजणार आहेत. प्राथमिक कलानुसार आघाडीला मतदारांनी सुरुवातीला का असेना आघाडी मिळवून दिली आहे.
अमरावती - UPDATE 8PM
अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी.. दुसऱ्या राउंड नंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर.
30918 हजार मतांची मोजणी पूर्ण...
किरण सरनाईक,अपक्ष 3131+2957= 6088
श्रीकांत देशपांडे(महा विकास आघाडी)
2300+2822 = 5122
शेखर भोयर,अपक्ष
2078 +2811= 4889
संगीता शिंदे अपक्ष उमेदवार
1304+1553=2857
पुणे | प्राथमिक कल हाती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर
पुणे | शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी अजूनही कायम
अमरावती विभाग शिक्षक निवडणूक | अपक्ष उमेदवार आघाडीवर - आघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानी तर भाजप उमेदवार नितीन धांडे पिछाडीवर, अपक्ष किरण सरनाईक 831 मतांनी पुढे
औरंगाबाद पदवीधर निवडणूक | आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर