दीपक भातुसे, मुंबई : सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे महाधिवक्त्या गृहमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. मंत्रालयात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक सुरू आहे. गृहमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध फेर विचार याचिका दाखल करायची की नाही याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विधि व नाय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली आहे. सुशांत सिंग प्रकरणी बैठक झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.