Police Requirements : पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने पोलीस भरती ( Maharashtra Police Requirements) प्रकिया झटपट राबवण्यासाठी मोठं पाऊस उचललं आहे.   

Updated: Oct 14, 2022, 05:26 PM IST
 Police Requirements :  पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा मोठा निर्णय title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : राज्यातील तरुणांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पोलीस भरती ( Maharashtra Police Requirements) प्रकिया झटपट राबवण्यासाठी मोठं पाऊस उचललं आहे. शिंदे सरकारने पोलीस भरतीचा शासन निर्णय (Government Rules) काढला आहे. शासनाने जीआर काढल्याने आता तरुणांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच पोलीस भरती होणार आहे. (maharashtra police recruitment in soon gr released 11 thousand 443 posts approved)

शासनाने काढलेल्या जीआरनुसार, पोलिसांची 11 हजार 443 पदं भरतीला यात मंजुरी देण्यात आली आहे. 100 टक्के पदं भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या भरतीमुळे पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. तसेच कर्मचारी कमी असल्याने पोलीस खात्यावर असलेला दबावही कमी होण्यास मदत होणार आहे.

पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या

दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना आणखी आठ सुट्ट्या वाढवून  दिल्या आहेत.