Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.

Updated: Jun 30, 2022, 12:06 AM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला title=

मुंबई :  राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राजीनामा सुपूर्त केला. (maharashtra political crisis uddhav thackeray reaches raj bhavan to submit his resignation cm post to governor bhagat singh koshyari)

उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. यानंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा राजभवनाबाहेर पडला आहे. त्याआधी उद्धव हे हे स्वत: ड्राईव्ह करत राजभवनावर पोहचले होते. यावेळेस त्यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे होते. तसेच यावेळेस राजभवनाबाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच घोषणा दिल्या. मात्र राजभवनाबाहेरच या ताफ्याला बाहेर रोखण्यात आलं. 

भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा

दरम्यान या राजीनाम्यानंतर भाजप उद्या गुरुवारी 30 जूनला सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. यासाठी भाजप राज्यपालांची भेट घेणार आहेत. तसेच नव्या सरकारचा येत्या 1 जुलैला शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.