Eknath shinde symbol Breaking: शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban (Symbole)) गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पाठवण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही (Shinde Group) तीन चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्ह निश्चित करण्यात आली आहेत. यात त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्हा ठाकरे गटानेही दिली आहेत. त्यानंतरआता त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हावर शिंदें गटानेही दावा केला आहे.
आता निवडणूक आयोग चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे आणि शिंदेंना कोणतं चिन्ह देणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
ठाकरे गटाची हायकोर्टात धाव
चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवल्याने उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. ठाकरे गटाच्या वकिलांचं निवडणूक आयोगात सबमिशन सुरू झालं आहे. ठाकरे गट निवडणूक आयोगात नव्या चिन्हाबाबत आपलं म्हणणं मांडत आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. निवडणूक आयोगाने युक्तिवाद करण्यास संधी न दिल्याने ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय...चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आलीय...दरम्यान ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदे गटही सज्ज आहे