Maharashtra Rain : राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह (Maharashtra Rain 2022) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय  

Updated: Sep 30, 2022, 07:59 PM IST
Maharashtra Rain : राज्यात 4 दिवस जोरदार पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : आता बातमी आहे पावसाबाबत. पावसाचा (Rain) परतीचा प्रवास सुरु झालाय. मुंबईत (Mumbai) गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळतोय. राज्यात (Maharashtra Rain Update) येत्या काही दिवसात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान (Imd) खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (maharashtra rain forcast warning of rain in some parts of state for the next 3 to 4 day konkan marathwda vidarbha) 

पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटात पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होतोय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x