राज्यात कोरोनाचे ६१५९ नवे रूग्ण

राज्यात ६५ कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद 

Updated: Nov 25, 2020, 08:23 PM IST
राज्यात कोरोनाचे  ६१५९ नवे रूग्ण

मुंबई : आज राज्यात ६१५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज राज्यात ६५ कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.६०% इतका आहे. आज ४८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण १६६३७२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४% इतका आहे. 

प्रशासन एकिकडे काही निर्बंध पुन्हा लागू करत कोरोनापासून नागरिकांना दूर ठेवण्याच्या तयारीत असतानाच नव्या कोरोना बाधितांचा आकडा आणखी आव्हानं उभी करताना दिसला. पण, त्यातच सोमवारी एक दिलासादायक वृत्त हाती आलं. ते म्हणजे कोरोनामुळं दगावणाऱ्या रुग्णसंख्येबाबतचं. 

मुंबईत आता १३७३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात हा आकडा जास्त आहे. ठाण्यात १५३४४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. राज्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना मृतांच्या सर्वाधिक निच्चांकी आकड्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात असतानाच हाती आलेल्या माहितीनुसार  ६१५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.