मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे... तसेच एसएमएसद्वारेही मोबाईलवर निकाल पाहता येणार आहे. विविध वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे..या परीक्षेसाठी राज्यभरातील ९ विभागातून १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. सकाळी ११ वाजता मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन निकालाची वैशिष्ट्य जाहीर केली जातील.
यापैंकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुमचा आसनक्रमांक टाकल्यानंतर निकाल तुमच्यासमोर असेल... या निकालाची प्रिंटही तुम्ही घेऊ शकता.
किंवा एसएमएसद्वारेही तुम्ही तुमचा निकाल मोबाईलवर मिळवू शकाल. यासाठी तुमचा आसनक्रमांक टाईप करून हा मॅसेज तुम्हाला ५७७६६ या क्रमांकावर पाठवा... थोड्याच वेळात निकाल तुमच्या मोबाईलवर येईल.