BREAKING : विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

विलिनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे

Updated: Nov 24, 2021, 10:49 PM IST
BREAKING : विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय title=

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात आज महत्त्वाची बैठक झाली. विलिनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळली आहे. 

अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
गेले 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपात कर्मचाऱ्यांची जी प्रमुख होती, ती म्हणजे परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं शासनात विलीनीकरण करा. याबाबतीत सरकार म्हणून आमची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत होतो. उच्च न्यायालयाने या संदर्भात तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. 12 आठवड्यांच्या आत या समितीला अहवाल द्यायचा आहे. विलीनीकरणाचा जो विषय आहे तो 12 आठवड्यांच्या आत मुख्यमंत्र्यांकडे दयावा आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं जोडून तो अहवाल उच्च न्यायलायात द्यावे असे आदेश आहेत.

ही समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल अशी राज्य सरकारची भूमिका आहे. कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण व्हावं. पण राज्य सरकारची भूमिका आहे हा विषय समिती समोर आहे. त्यामुळे विद्यार्थी, आणि प्रवाशांची अडचण निर्माण झाली होती. समितीचा अहवाल यायला अजून बराच वेळ आहे, अशा वेळेला काय करायचं याबाबत आम्ही सतत विचार करत होतो. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर आणि  सदाभाऊ खोत तसंच मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली.

विलीनीकरणाचा निर्णय  समितीने राज्य सरकारला दिला तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे.

अशी असणार कर्मचाऱ्यांची पगारवाढ
आज सरकारने निर्णय घेतला आहे, जे कर्मचारी 1 वर्ष ते 10 वर्ष या कॅटेगिरीत आहे, या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांचं पूर्ण वेतन 17 हजार 80 होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. जवळजवळ 41 टक्के ही वाढ आहे, आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे.

10 ते 20 वर्षांपर्यंत जे कर्मचारी आहेत त्यांच्या मूळ वेतनात 4 हजार रुपायंची वाढ होणार आहे, ज्यांचा 23 हजार 40 होता, वाढ झाल्यानंतर त्यांता पगार 28 हजार 800 रुपये झाला आहे.

20 वर्ष आणि त्याहून अधिक अशा लोकांचा जो पगार होता, त्यात 2 हजार 500 ने वाढ केली आहे. ज्यांचं मूऴ वेतन 26 हजार होतं, आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं. त्यांचं वेतन आता 41 हजार 40 रुपये झालं आहे. ज्यांचं वेतन 53 हजार 280 होतं त्यांच्या पागरात अडीच हाजारांची वाढ त्यामुळे त्यांच वेतन 56 हजार 880 होईल.

कमी पगार आणि चांगले पगार अशा दोन्ही कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. बाकीच्या राज्यांच्या तुलनेत आम्ही त्यांना नेऊन ठेवलं आहे. 

10 तारखेच्या आत पगार

कोरोनामुळे गेली दोन वर्षा एसटी आर्थिक नुकसानात होती. त्यातदेखील राज्य सरकराने एसटीला 2 हजार 700 कोटींची मदत ही पगारासाठ दिली होती. पण काही कारणास्तव त्यांचे पगार उशीरा होत होते. एसटीचा पगार यापुढे महिन्याच्या 10 तारखेच्या आत होईल अशी हमी घेतली आहे. 

कर्मचाऱ्यांसाठी इन्सेंटिव्ह योजना

कामगारांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठी इन्सेंटिव्हची योजना आम्ही जाहीर करतो. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे ड्रायव्हर कंडक्टर असतील ज्याने जास्त पैसे आणले त्याबाबतीत इन्सेटिव्ह दिलं जाईल. 

ड्युटीवर हजर राहिल्यास पगार मिळणार
कर्मचाऱ्यांना काही जाचक अटी वाटत होत्या. त्यातली एक म्हणजे कामावर येतात, पण ड्यूटी नसल्याने त्याची रजा लावली जाते. पण यापुढे जो कामगार कामावर हजेरी लावले, त्याला त्या दिवसाचाही पगार मिळणार आहे.

ज्या कामगारांनी आत्महत्या केली आहे, त्या कामगारांच्या कुटुंबाचा सहानभूतीपूर्वक विचार करेल.