Maharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार?

Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. 

Updated: Dec 15, 2022, 08:56 AM IST
Maharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार? title=
CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा (CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis Govt) आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Extension) होणार होणार असे सांगितले जात होते. (Maharashtra Political News)  मात्र, विस्ताराचा मुहूर्त मिळत नव्हता. काल दिल्लीत शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस यांची रात्री उशिरा अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. यावेळी शाह-शिंदे-फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठकीत खलबतं झालीत. त्यानुसार नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटी विस्ताराला मुहूर्त मिळणार, असे सांगितले जात आहे.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, या सरकारचा अद्याप विस्तार झालेला नाही. मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांचे जबाबदारी देण्यात आली आहे. दोन-दोन तसेच तीन - जिल्ह्यांची जबाबदारी एकाच मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री नसल्याने याचा ताण त्या जिल्ह्याच्या विकास कामांवर पडत आहे. तसेच अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांचीही निराशा होताना दिसत आहे.  शिंदे सरकारमध्ये सध्या काही आमदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. काहींही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसेच अपक्ष आमदारांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे तेही आमदार नाराज आहे. वाढती नाराजी दूर करण्यासाठी आता नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या विस्तारात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोघांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली होती. अनेक दिवस दोघेच राज्याचा कारभार चालवत होते. त्यानंतर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. सध्या शिंदे सरकारमध्ये एकूण 20 मंत्री आहेत. त्यांच्यावर अनेक खात्यांच्या जबाबदाऱ्या आहेत.