मुंबई : दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक (maharshtra ssc and hsc exam 2022) जाहीर झालंय. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची तर 21 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. दहावी बारावीत अनुत्तीर्ण झालेल्यांची ही परीक्षा आहे. (maharshtra ssc and hsc exam 2022 schedule supplementary examinations announced)
दहावीचे निकाल लागले असले तरी अकरावीच्या प्रवेशाचा खोळंबा होणार आहे. कारण अद्याप केंद्रीय बोर्डाचे म्हणजे CBSE आणि ICSEचे निकाल लागलेले नाहीत.. त्यामुळे अकवारी प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात झाल्यात. त्यामुळे या मंडळाला प्रथम आणि द्वितिय सत्रातील परीक्षेचे गुण एकत्र करुन निकाल तयार करायचे आहेत. ICSEचा निकाल जुलैमध्ये जाहिर होण्याची शक्यता आहे.. निकाल जाहिर न झाल्यानं विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु झालेली नाहीये.
या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळता येणार नाही. त्यामुळे ज्युनियर कॉलेज सुरु होण्यासाठी सप्टेंबर अखेर उघडण्याची शक्यता आहे.