मुलाला आईपेक्षा जास्त संपत्ती जवळची; जन्मदातीचा मृतदेह फेकला माथेरानच्या दरीत

संपत्तीसाठी मुलाकडून आईचा खात्मा...  मुलांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आई वाटेल ते करते. पण एका मुलाने तर संपत्तीसाठी जन्मदातीचा खून केला आहे.  

Updated: Dec 10, 2022, 12:47 PM IST
मुलाला आईपेक्षा जास्त संपत्ती जवळची; जन्मदातीचा मृतदेह फेकला माथेरानच्या दरीत title=

Man kills mother in Mumbai : 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...' आई काही कामासाठी घराबाहेर गेली तरी घर भकास वाटतं. मुलांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आई वाटेल ते करते. पण एका मुलाने तर संपत्तीसाठी जन्मदातीचा खून केला आहे. आईवर बेसबॉल बॅटने हल्ला करत मुलाने आईचे प्राण घेतले आहेत. ही घटना मुंबईतील आहे. आईचा खून केल्यानंतर निर्दयी मुलाने मृतदेह माथेरान येथील दरी टाकून दिला. एवढंच नाही पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने नोकराची मदत घेतली. (Man kills mother in Mumbai)

संपत्तीसाठी मुलाकडून आईचा खात्मा... 

वीणा गोवर्धनदास कपूर ( Victim Veena Kapoor) असं आईचं नाव आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. तर ज्यामुलाने वीणा यांचा खून केला त्याचं नाव सचिन कपूर (Sachin Kapoor) असं आहे. तर पुरावे नष्ट करण्यास मदत केलेल्या नोकराचं नाव छोटू उर्फ लालकुमार मंडह (Lalukumar Mandal)  असं आसून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सध्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

वीणा कपूर यांचा मोठा मुलगा अमेरिकेत असून त्या धाकटा मुलगा सचिनसोबत मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होत्या. वीणा आणि सचिन यांच्या कायम संपत्तीमुळे वाद होत असल्याचं पोलिसांनी (Police) सांगितलं आहे. संपत्तीमुळे वाद होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी वीणा आणि सचिन यांच्या मोबाईलच्या लोकेशनबद्दल माहिती मिळवली. Man kills mother in her  residence in Juhu

वाचा | “होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge

 

दरम्यान पोलिसांनी मुलगा आणि नोकराला अटक केल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आईचा खून केल्यानंतर मृतदेह एका बॉक्समध्ये भरून नोकर छोटूच्या मदतीने  रायगड जिल्ह्यातील माथेरान (Matheran ) येथे दरीमध्ये फेकल्याची कबुली देखील त्याने दिली. 

संपत्तीसाठी मुलाने आईला जीवे मारल्याची धक्कादायक घटना जूहूच्या गुलमोहर रोड येथील कल्पतरू सोसायटीमधील आहे. सोसायचीचा सिक्युरिटी सुपयवायझर म्हणून काम करणाऱ्या जावेद अब्दुला मापारी यांनी वीणा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली. त्यांनंतर पोलीस चौकशीतत्यांचा त्यांचा खून झाल्याचं समोर आलं आहे.