close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच

मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे.  

Updated: May 15, 2019, 07:50 PM IST
मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
संग्रहित छाया

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांची आज खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणात या विद्यार्थ्यांनी प्रवेश कल्यानंतर त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. यात विद्यार्थ्यांची चूक नसून राज्य सरकारने त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.