मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे (Ketaki Chitale) वादात सापडली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी केतकी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस तिच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. (marathi actress ketaki chitale suffering apasmara disease know what is symptoms)
वेळोवेळी वादात अडकणाऱ्या केतकीला दुर्मिळ आजार आहे. केतकीला एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार आजार आहे. केतकी गेल्या काही वर्षांपासून या आजारावर उपचार घेत आहे.
अनेक जणांमध्ये आपल्याला असलेल्या आजाराबाबत न्यूनगंड असतो. मात्र केतकी या आजाराबाबत अनेक अनुभव सोशल मीडियावरुन शेअर करते. तसेच आजारांबाबत सकारात्मकतेचा सल्लाही देते.
सातत्याने आकडी येणं हे या आजाराचं मुख्य लक्षण आहे. हा दीर्घकालीन आजार आहे. यालाच अपस्मार म्हटलं जातं. अपस्मार अतिशय दुर्मिळ असा आजार आहे. हा आजार कधीच पूर्ण बरा होत नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवता येतं.