मेजर कौस्तुभ राणेंना बहिणींची राखी, चॉकलेट्सची रक्षाबंधन भेट

मेजर कौस्तुभ राणेंना अखेरचा निरोप देताना मीरारोडमधलं वातावरण सुन्न करणारं होतं. 

Updated: Aug 9, 2018, 04:19 PM IST

मुंबई : मेजर कौस्तुभ राणेंना अखेरचा निरोप देताना मीरारोडमधलं वातावरण सुन्न करणारं होतं. कौस्तुभ यांची आई, वडील, पत्नी, आणि बहिणी यांचे अश्रू थांबत नव्हते. कौस्तुभ एकुलता एक मुलगा असून त्यांना एक सख्खी तर चार चुलतबहिणी आहेत. बहिणींचा भावावर प्रचंड जीव. काही दिवसांवरच रक्षाबंधनाचा सण आलायं. कौस्तुभ यांचा मुलगा दोन वर्षांचा आहे.

बहिणींनी दिली भेट

काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला होता.मेजर कौस्तुभ यांना कॅडबरी चॉकलेट खूप आव़डायचं. म्हणूनच त्यांना शेवटचा निरोप देताना बहिणींनी त्याला राख्या, चॉकलेट आणि केकची भेट दिली. ते पाहून  तर सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला.

अखेरचा निरोप

कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सगळ्यात शेवटी कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. कौस्तुभची आई मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका होती. मुलाला अखेरचा निरोप देताना या वीरमातेचे अश्रू थांबत नव्हते.अत्यंत शोकाकूल आणि भावूक वातावरणात कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यात आले.