Measles Outbrek in Mumbai : मुंबईत (Mumbai) गोवरचा उद्रेक झालाय. आतापर्यंत गोवरमुळे (Measles) 7 संशयितांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मुंबईत जानेवारी पासून गोवरचे 142 गोवरचे आढळले आहेत. तर सद्यस्थितीत 61 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईची आरोग्य यंत्रणा (Health Department) अलर्ट मोडवर (Alert Mode) आलीय. कोरोना काळात अनेकांनी मुलांना गोवरची लस दिली नाही. लसीकरणाकडे (Vaccination) टाळाटाळ केल्यामुळेच गोवरचा प्रसार वाढताना दिसतोय.
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
लसीकरण मोहिम राबवण्याचे निर्देश
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर (Cabinet Meeting) मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तिथे तातडीने लसीकरणाची (Vaccination) मोहिम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला (Municipal Corporation) दिले.
61 रुग्णांवर उपचार सुरु
मुंबईत 164 बालकांना गोवरची (Measles) लागण झाली असून त्यातील 61 रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितलं. लसीकरणासाठी 900 हून अधिक केंद्र सुरू करण्यात आली असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसंच बालकांना अ जीवनसत्वचा डोस देण्यात असल्याचे त्यांनी सांगितलं.
जनजागृतीसाठी धर्मगुरुंची मदत
गोवरची साथ रोखण्यासाठी कम्युनिटी लीडर्सची मदत घेतली जाणार आहे. कम्युनिटी लीडर्सशी संपर्क साधून गल्ल्या, मोहल्ल्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन गोवरच्या साथीचा आढावा घेतला. गोवरग्रस्त मुलं, त्यांचे पालक आणि डॉक्टरांशी त्यांनी बातचीत केली.