रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. 

Updated: Jun 24, 2018, 08:58 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.  मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेर मुलंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक चालणार आहे. या काळात अप-धीम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरुन वळवण्यात येईल. या कालावधीत नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल थांबवणार नाहीत.

अप-डाऊन मार्गावर

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल-वाशी-बेलापूर दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी १०.३४ ते दु. ३.३९ पर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगावमध्ये अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.