मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द

विलंब टाऴण्यासाठी तुम्हाला वेळेच्या आधी निघावे लागणार आहे.

Updated: Jan 6, 2019, 08:19 AM IST
मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द  title=

मुंबई : रविवारच्या सुट्टीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे ट्रॅक दुरूस्ती आणि डागडुजीसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असतो.  मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक समजून घ्या. नाहीतर ऐनवेळी तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीप्रमाणे गर्दी नसेल. पण तरीही विलंब टाऴण्यासाठी तुम्हाला वेळेच्या आधी निघावे लागणार आहे.

Image result for megablock zee

मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द तर काही फेऱ्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेववर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणार असल्यास तुम्हाला थोडा वेळ आधी निघावे लागेल.

Image result for megablock zee

हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, सीएसएमटी-वांद्रे दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने याचीही नोंद प्रवाशांनी घ्यावी. 

Image result for megablock zee

तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गाहून येणाऱ्यांना वेळेप्रमाणे न निघाल्यास थोडा विलंब होऊ शकतो.