रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक...

Updated: Feb 2, 2020, 08:06 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईकरांनी आज मेगाब्लॉक पाहूनच, वेळेचं नियोजन करूनच प्रवास करा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर भायखळा ते विद्याविहार डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात डाऊन लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. तर डाऊन धिम्या लोकल चिंचपोकळी, करीरोड, विद्याविहार या स्थानकात थांबणार नाही. 

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११ ते दुपारी पावणे ३.४० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल -सीएसएमटी मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येतील. 

तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात बोरीवली ते विरार दरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावर धावतील.