आर्थर रॉड जेलमध्ये आरोपीची आत्महत्या

आर्थर रॉड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या साबीरअली गरीबुल्ला शेख याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

Updated: Feb 5, 2018, 11:12 PM IST
आर्थर रॉड जेलमध्ये आरोपीची आत्महत्या title=

मुंबई : आर्थर रॉड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या साबीरअली गरीबुल्ला शेख याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

साबीर अली याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या खबऱ्याची साबीर अलीने हत्या केली होती. त्या आरोपाखाली तो अटकेत होता. साबीर अलीवर मानसोपचार तज्ज्ञातर्फे उपचारही सुरू होते. 

तरीही त्याच्यावर विशेष लक्ष का ठेवण्य़ात आलं नाही असा सवाल उपस्थित होतोय.