Mhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी

आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Updated: Jan 17, 2023, 03:26 PM IST
Mhada Lottery 2023 :थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी title=

South Mumbai Mhada Lottery 2023 : मुंबईत हक्काचं घर असाव असं प्रत्येकाचच स्वप्न असत. त्यातही साऊथ मुंबईत (south mumbai) घर खरेदीचं स्वप्न पहाणं म्हणजे सर्व सामान्यच नाही तर मध्यमवर्गींयाना देखील आभाळाला हात लावण्यासारके आहे. मात्र, आता थेट साऊथ मुंबईमध्ये घर खरेदीची इच्छा पूर्ण होणार आहे. थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं बांधली जाणार आहेत. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

म्हाडाच्या गृह प्रकल्पासाठी कुलाबा परिसरात चार एकर जागा आता उपलब्ध होणार आहे. म्हाडा संक्रमण शिबीर भूखंडाचा विकास केला जाणार आहे.  मोडकळीस आलेले इमारतील लोकांना 40 वर्षांनंतर हक्काचे घर मिळणार आहे. चार एकर जागेवर म्हाडा सदनिका बांधू शकले 10 लाख चौरसफूट बांधकाम होऊ शकते. या प्रकल्पाअंतर्गत दहा हजार सदनिका कुलाबा सारख्या भागात उपलब्ध होऊ शकतात असं राहुल नार्वेकर म्हणाले. 

ठाण्यात 15 ते 44 लाखांपर्यंत फ्लॅट

कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई येथे ही मोक्याच्या ठिकाणी घरे आहेत. सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील घरांच्या किंमती या 15 ते 44 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. दरम्यान,  पुणे मंडळाच्या 5 हजार 990 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री आणि  अर्ज स्विकृती सुरु झाली आहे. 

या लॉटरीत 1 हजार 250 घरं पंतप्रधान आवास योजनेतील असणार आहेत.  249 घरं ठाण्याच्या पाचपाखाडीत रेमंड प्रकल्पात असणार आहेत.  अत्यल्प गटासाठ अंदाजे 300 चौ.फु. घरांची अंदाजे किंमत 15 लाख 50 हजार इतकी असणार आहे.  25 घरं सानपाडा येथे असणार आहेत. गुडविल प्रकल्पातील अल्प गटातील घर 350चौ.फुटांचे असणार आहे. या घरांची किंमत 16 ते 18 लाख दरम्यान असण्याचा शक्यता आहे. 

घणसोली 24 घरं अल्प गट असून याची किंमत 24 लाख रुपयांच्या घरात आहे. तर घोडबंदर 59 घरं असून अंदाजीत किंमत 16 लाख असणार आहे. तर खोणी अत्यल्प गटासाठी 60 घरे असून किंमत 17 लाख रुपयांदरम्यान असेल. तर शिरढोण येथे 340 घरं असून 14 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता आहे.