मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest)) यांना तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर ईडीने (ED) अटक केली आहे. यानंतर नवाब मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. (enforcment dirctporate arrest to minority minister nawab malik)
54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. ईडीकडून (ED) अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. ईडीने नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
सेशन कोर्टात तब्बल अडीच तास दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर सेशन कोर्टाने नवाब मलिक (Nawab Malik) यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तीवाद
नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ही घटना २००३ पूर्वीची आहे. तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा कारावाई का करण्यात आली नाही असा मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला. आज अचानक 20 वर्षांनी अटक करुन तपास यंत्रणा १४ दिवसांची कोठडी कशी मागू शकत, असा युक्तीवाद अॅड. अमित देसाई यांनी केला.
जेव्हा तपास यंत्रणा अटक करतात, तेव्हा अधिकार जबाबदारीने वापरणं अपेक्षित असतं, कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे, बेकायदेशी अटकेची किंमत न्यायालयीन वेळ खर्ची घालून मोजली आहे, असंही अॅड. अमित देसाई यांनी म्हटलं आहे. गेल्या तीस वर्षांपासून दाऊद या गुन्हांसाठी ओळखाल जातो, पण एफआयआर ३ फेब्रुवारीलाच नोंदवला गेला. यापैकी कोणत्याही आरोपांशी मलिक यांचा संबंध जोडणारे पुरावे नाहीत असं अॅड. अमित देसाई यांनी कोर्टात सांगतिलं.
टेरर फंडींग या शब्दावर अॅड अमित देसाई यांनी आक्षेप घेतला. उद्या दहशतवादी फंडिंग अशी ईडीला हेडवाईन करायची आहे का, असा सवालही अमित देसाई यांनी उपस्थित केला आहे.
नवाब मलिक यांना अटक
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आज सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आलं.
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून गुन्हेगारांशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातून या अटकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मलिकांना झालेल्या या अटकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार असल्याचं दिसत आहे.
ईडीचा ताफा आज सकाळीच मलिकांच्या घरी पोहचला. मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर मलिकांची चौकशी करण्यात आली. ही माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली. तसेच केंद्र सरकार हे केंद्रीय तपास यंत्रणेचा सूड बुद्धीने वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.
या सर्व गदारोळादरम्यान मलिकांची चौकशी सुरुच होती. मात्र यानंतर अखेर 7-8 तासांनी ईडीने त्यांना अटक केली. विशेष बाब म्हणजे नवाब मलिक हे मंत्रीपदावर असताना अटक झालेले दुसरे मंत्री ठरले आहेत. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती.