अखेर राज ठाकरे यांचं भोंग्याच्या भूमिकेवर नाराज वसंत मोरेंना बोलावणं

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यावरच्या विधानामुळे पुणे मनेसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Apr 6, 2022, 10:47 PM IST
अखेर राज ठाकरे यांचं भोंग्याच्या भूमिकेवर नाराज वसंत मोरेंना बोलावणं title=

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यावरुन विधान केलं. राज ठाकरेंनी केलेल्या भोंग्यांच्या विधानाचे चांगलेच पडसाद पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या या विधानामुळे पुणे मनेसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली. मोरे यांनी मनसेप्रमुखांच्या या भूमिकेचा विरोध केला. दरम्यान आता राज ठाकरे हे स्वत: मोरेंची नाराजी दूर करणार आहेत. (mns chief raj thackeray invited vasant more on mns bhonga loudspeaker strategy)

राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना शुक्रवारी मुंबईतील 'शिवतीर्थ' (Raj Thackeray Home) निवासस्थानी वसंत मोरे यांना बोलावलं आहे. या भेटीत राज ठाकरे मोरे यांची नाराजी दूर करणार असल्याचं समजत आहे. वसंत मोरे यांच्यासह मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबरही (Sainath Babar) येणार असल्याचं समजत आहे. 

वसंत मोरे यांची भूमिका काय? 

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या  प्रभागात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या भागात हनुमान चालिसा लावणार नसल्याची भूमिका मोरे यांनी घेतली आहे. यावरुनत आता राज ठाकरे मोरे यांची नाराजी दूर करणार आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे यांनी नाराजी दूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

"मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका", असं ठाकरे काय म्हणाले होते.