मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. दुसरीकडे त्यांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यापुढचं आव्हान वाढलं आहे. यावरुन मनसेने शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत यावर टीका केली आहे.
चिन्हं बदलत, कुणाची गोठतात आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतंय. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमेर खोपकर यांनी दिली आहे.
चिन्हं बदलतात… कुणाची गोठतात
आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतंय pic.twitter.com/58J79DgMMQ— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 8, 2022
बाळासाहेबांच्या शिवसेनेची लावली वाट,
बाळासाहेबांनी ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केला घात !#शिवसेना #ShivsenaSymbol #ElectionCommissionOfIndia pic.twitter.com/2THrUanvRY— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 8, 2022