मुंबई : राज ठाकरे यांनी सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारकडे त्यांनी सीएए कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. सीएए आणि एनआरसीवर केंद्र सरकारने त्वरित कारवाई करायला हवी.
हा देश साफ व्हायलाच पाहिजे. एकदा देशाने कडक होण्याची गरज देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलंय. यापुढे दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल असे म्हणत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आज आक्रमक दिसले.
बांगलादेशातून 2 कोटी लोक आलेत, पाकिस्तानमधून किती आले असतील याचा पत्ता नाही. एक जागा आहे तिथे परदेशातील मौलवी येतात. मोठं काही तरी घडवतायत. मी लवकर हे देशाच्या आणि इथल्या गृहमंत्र्यांना सांगणार असल्याचे देखील ते म्हणाले.
हिंदु बंधू मातांनो आणि भगिनींनो म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशातून हाकललंच पाहिजे. पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगाणीस्तान इथे धार्मिक अत्याचार होतील त्यांना भारत नागरिकत्व देईल असा कायदा आहे, तो 1955 सालचा कायदा असल्याचेही ते म्हणाले. 1955 सालची स्थिती वेगळी होती आज वेगळी आहे.
केंद्र सरकारवर टीका केली की हे भाजपा विरोधीचांगले काम केले स्तुती केली तर ते भाजपाच्या बाजूने म्हणतात. यात मध्ये काही आहे की नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
भारतात १३५ कोटी लोकसंख्या, त्याला आकार नाही, मात्र, धार्मिक अत्याचार झाल्यावर तुम्हाला आश्रय द्यावा लागतो. सीएए मध्ये गैर काय आहे ? असे म्हणत एनआरसी, माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली काय या लोकांना देशात अनेक समस्या आहेत. मला माहिती आहे, मात्र, घुसखोरांची समस्याही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.