'कोरोनाच्या संकटात शिवसैनिक घरात बसून राहिले, मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन काम केले'

मनसे शिवसेना आमने-सामने 

Updated: Jun 27, 2020, 03:09 PM IST
'कोरोनाच्या संकटात शिवसैनिक घरात बसून राहिले, मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन काम केले'

मुंबई :  कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या साधन सामुग्रीमध्ये भ्रष्टाचारा संदर्भात मनसेने शुक्रवारी आरोप केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेकडे सध्या कुठल काम नाही आहे, अशी टीका केली होती. अनिल परब एवढ्यावरच थांबले नाहीत तर,'मनसेला सध्या दुसरं कुठलं काम नाही आहे. अनिल परबांनी संजय नाईकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. परिवहनमंत्री अनिल परब म्हणतात की,'उद्धव ठाकरेंवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते. यातून मनसेचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्याच्या आरोपांना महत्व देत नाही.' मनसेकडे राजकीय अजेंडा नाही. त्याला मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी उत्तर दिले. 

कोरोनाचा पार्श्वभूमीवर आता मनसे आणि शिवसेना एकमेकांच्या आमनेसामने उभी राहिली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. 

अनिल परब यांना परिवहन खात कळत नाही कोरोनाच्या काळात ते गायब होते. कोरोनाच्या काळात त्यांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं. पण परिवहन मंत्री अनिल परब हरवले होते आता ते सापडले आहेत, असा आरोप संजय नाईक यांनी केला आहे. 

कोरोनाच्या काळात शिवसैनिक घरात बसून होता त्यावेळी मनसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होता. मनसैनिक रस्त्यावर दिसू लागल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काम करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या काळात सर्व सामान्यांसाठी काम करणे हा आमचा अजेंडा होता हे त्यांच्या लक्षात आलेले नाही.

महानगरपालिका तुमच्याकडे, सरकार तुम्हाला बनवायला दिले म्हणून काय पैसे ओरबडतच राहणार का ? हा एकमेव कार्यक्रम आहे का? असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. मुंबईत घडतंय ते पाप कोणाच याच उत्तर शिवसेनेला द्याव लागेल. शिवसेने तयार राहावं आम्ही चारी बाजूने उत्तर मागणार सोडणार नाही, असं संजय नाईक यावेळी म्हणाले.