'कोरोना पसरु न देणं आणि मृत्यू दर कमी करणं सर्वात मोठं आव्हान'

'महाराष्ट्राची ताकद विविधतेत आहे'

Updated: Jun 27, 2020, 01:45 PM IST
'कोरोना पसरु न देणं आणि मृत्यू दर कमी करणं सर्वात मोठं आव्हान' title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाचं संकट अचानक आलं. यावेळी कोरोना पसरु न देणं आणि मृत्यू दर कमी करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावं लागलं. सर्व कारभार ठप्प झाले. मात्र आता अनलॉकमध्ये रेग्युलर सोर्सेस सुरु करणं आव्हान, असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे   #e_conclave मध्ये बोलताना सांगितलं. 

महाराष्ट्राची ताकद विविधतेत आहे. सफरचंद सोडलं तर जवळपास सर्व फळं महाराष्ट्रात पिकतात, महाराष्ट्रातील मुंबईत आयटी सेक्टर उत्तम आहे, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे असल्याचं ते म्हणाले. सध्या खरीप हंगामावर बारकाईने लक्ष आहे. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांनी होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतापर्यंत बियाणं पोहचवण्याचं यशस्वी काम सुरु केलं होतं. शेतकऱ्याची कर्जमाफी योजना कोरोना येईपर्यंत पूर्णपणे राबवत होतो. मात्र कोरोना आल्यानंतर ही प्रक्रिया थांबली, मात्र आता अनलॉकमध्ये हळूहळू बियाणं, कर्जमाफी ही सर्व कामं पुन्हा सुरु करत असल्याचं, अजोय मेहता यांनी सांगितलं.

'विरोधी पक्षाने अडथळे आणण्याऐवजी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे'

कोरोनाची निराशाजनक परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने उद्योगांना जागा उपलब्ध करुन देणं, यांसारखी जनतेच्या हितासाठी काही चांगली पावलं उचलली. कोरोनानंतर आता रोजगार टिकवणं आणि रोजगार वाढवणं महत्त्वाचं असून त्यावर भर देण्यात येणार आहे. रोजगाराला प्राधान्य देणं, फिजिकल चॅलेन्ज लोकांना मेन स्ट्रिममध्ये, मुख्य प्रवाहात आणणं यासाठी प्राधान्य असणार आहे. एका क्षेत्रातील उद्योगाला मदत केल्यानंतर, त्यावरुन दुसऱ्या क्षेत्रातील उद्योगालाही मदत कशी होईल यासाठी अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचं अजोय मेहता म्हणाले.

निसर्ग वादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. अर्थव्यवस्थामध्ये केंद्रातून राज्याला पैसे वाटपाचा फॉर्म्युला असतो. पूर आल्यानंतर, घर पडल्यावर अशा विविध संकटांनुसार केंद्रातून पैसे मिळण्यासाठी काही ठरलेले निकष असतात. त्यानुसार पैसे दिले जातात. राज्याला केंद्रातून पैसे येतात, त्यासाठी पाठपुरावाही करतो आणि त्यानुसार काम करतो. 

#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

मी कायम महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला आहे, मला राज्यासाठी काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी आभारी आहे. राज्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कामाची भूमिका कोणतीही असली तरी, मी नियमाला धरुन लोकांच्या हितासाठी काम करतो. मी महाराष्ट्राच्या फायद्याचाच विचार करेन. लोक काय म्हणतील त्याकडे कधी लक्ष दिले नाही, असं स्पष्ट मत अजोय मेहता यांनी 'झी २४ तास'शी #e_conclave या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं.