दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस

एसटीच्या जादा बसेस सोडण्य़ाची व्यवस्था

Updated: Oct 17, 2018, 12:37 PM IST
दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस title=

पुणे : दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या जादा बसेस सोडण्य़ाची व्यवस्था केली आहे. 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, स्वारगेट बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी आरक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपवरून तुम्ही तिकीट बूक करु शकता. 

विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह राज्यातील इतर भागातील प्रवाशांसाठी एसटीने जादा बसेस सोडल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून नाशिक, औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान (वाकडेवाडी) येथून नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, हिंगोली, जाफराबाद, जालना, लातूर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणासह जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून नियमित सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, लातूरसाठी तर स्वारगेट येथून नियमित सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती, भोर यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.