मुंबईतील ७ वॉर्ड मध्ये २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

Updated: Apr 22, 2020, 11:59 AM IST
मुंबईतील ७ वॉर्ड मध्ये २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

मुंबई : जगात कोरोनाचं थैमान सुरु असताना भारतात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. त्यामुळ भारताची आर्थिक राजधानी आज थांबली आहे. मुंबईवर मोठं संकट ओढावलं असताना शासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चिंता वाढल्या आहेत. त्यातच मुंबईतील 7 वॉर्ड असे आहेत जेथे 200 हून अधिक रुग्ण आहेत. तर 13 वॉर्ड असे आहेत जेथे 100 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहे.

मुंबईतील वॉर्ड आणि रुग्णांची संख्या

जी साऊथ -  वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 487 रुग्ण- 67 रुग्ण बरे झाले

ई वॉर्ड - भायखळा - 349 रुग्ण - 31 रुग्ण बरे झाले.

जी नॉर्थ -  दादर, माहिम, धारावी - 251 रुग्ण, 19 रुग्ण  बरे झाले 

एल वॉर्ड -  कुर्ला परिसराचा समावेश - 240 रुग्ण, 8 रुग्ण बरे झाले 

एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा 228  रुग्ण, 16 रुग्ण बरे झाले  

के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - 223 रुग्ण, 31 बरे झाले  

डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - 207 रुग्ण,  32 रुग्ण बरे झाले 

100 हून अधिक रुग्ण असलेले वॉर्ड

के ईस्ट - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 181 रुग्ण, 38 बरे झाले 

एच इस्ट - वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ 
(मातोश्री) - 154 रुग्ण, 16 रुग्ण बरे झाले 

एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 149 रुग्ण, 14 रुग्ण बरे झाले 

एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश -  119 रुग्ण, 8 बरे झाले.

ए वॉर्ड - कुलाबा, कफपरेड , फोर्टचा परिसर- 118 रुग्ण, 3 बरे झाले.

एम वेस्ट - चेंबुरचा समावेश - 104 रुग्ण, 13 बरे झाले.