२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Dec 3, 2017, 05:16 PM IST
२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणांहून नागरिक रेल्वेरुळ क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात.

२०१७ मध्ये आतापर्यंत १,४४३ लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. यातील ८१७ जणांचा जीव हा रेल्वे रुळ ओलांडताना झालाय. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर अनेक सवाल उठत आहेत.