मुंबई विमानतळावर 25 कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक

smuggling  heroin : मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.  

Updated: Sep 22, 2021, 12:24 PM IST
मुंबई विमानतळावर 25 कोटींचे हेरॉईन जप्त, दोन महिलांना अटक

मुंबई :  smuggling  heroin : मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईन तस्करीप्रकरणी आईसह मुलीला अटक करण्यात आली आहे. कतार एअरवेजच्या विमानाने या दोन महिला मुंबईत आल्या होत्या. त्यांनी बॅगेतून लपवून 5 किलो हेरॉईन आणले होते. मुंबई कस्टमने केलेली ही मोठी कारवाई आहे. (Mother-daughter duo held at Mumbai airport for smuggling  heroin worth Rs 25 crore)

मुंबई विमानतळावरुन सुमारे 25 करोड रुपयांचे हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत कतार एअरवेजच्या विमानाने या दोघी मुंबईत येत असताना त्यांनी त्यांच्या बेगॅत सुमारे 5 किलो हिरोईन लपवून आणले होते. मात्र कस्टम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारी त्यांची चौकशी केल्यानंतर ही बाब पुढे आली. 

या महिलांच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता लपवून ठेवलेले सुमारे 25 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. भारतात अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी या दोन महिलांना मोठी रक्कम मिळणार होती. या दोघी विदेशी नागरिक असुन त्यांना न्यायालयात हजार केले असता 5 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

दरम्यान, आआधी गुजरातमध्ये कोट्यवधी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानहून तस्करी झाल्याची माहिती पुढे आली आहे. गुजरातमध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यातील एका बंदरातून सुमारे तीन टन हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 19 हजार कोटी रुपये आहे, असे सांगण्यात आले.

मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमध्ये ठेवलेले हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहे. हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कारवाईत दोन जणांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.