मुंबई : मुख्य स्थानकातून निघालेली एक्सप्रेस ठरलेल्या स्थानकांवर आणि सिग्नल असेल तर थांबते हे आपल्या सर्वांनाच माहितेय. या शिवाय काय कारण असू शकतात ? तुम्हाला काय वाटत ?.. आजही एक एक्सप्रेस मध्येच थांबलीय पण त्या मागचं कारण ऐकून तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावी ते कळणार नाही. आज सकाळी साडे दहा वाजता गांधीधाम एक्सप्रेस ट्रेन वसई आणि नालासोपार्याच्यामधे थांबवण्यात आली. एक्सप्रेस मध्येच का थांबली असा प्रश्न प्रवाशांना पडला पण याच कारण काही त्यांना सापडल नाही. थोड्या वेळाने ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि प्रवाशांच विचारणही बंद झालं.
गांधीधाम एक्सप्रेस थांबवन्याच कारण ऐकाल तर आपण थक्क व्हाल. मोटरचालकाला लघुशंका आल्याने त्याने ही गांधीधाम एक्सप्रेस थांबवली होती. याचा वीडीयो सध्या समोर आला आहें. मोटरमन एक्सप्रेस थांबवून खाली उतरला आणि त्याने ट्रॅकवर लघुशंका केली.
लघुशंका झाल्यावर त्याने एक्सप्रेस पुढच्या दिशेने मार्गक्रमण केल. मोटरमनने मध्येच रेल्वे थांबविणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे होऊ शकते.
त्यामुळे रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहण महत्त्वाचं आहे.