एमटीएनलची ग्राहक संख्या घटली, कर्मचाऱ्यांवर संक्रांत

 एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. 

Updated: Nov 29, 2018, 01:18 PM IST
एमटीएनलची ग्राहक संख्या घटली, कर्मचाऱ्यांवर संक्रांत  title=

मुंबई : एअर इंडिया पाठोपाठ आता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही कंपनी सुद्धा आर्थिक दृष्टया अडचणीत सापडली आहे. निधीच्या कमतरतेमुळे आता एमटीएनएल कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळणार नाही मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. एमटीएनएल ही सरकारी कंपनी असून मुंबई आणि दिल्ली या महानगरात कंपनीची ग्राहक संख्या जास्त आहे.

ग्राहक संख्या घटली 

 १९९२ सालापर्यंत मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात एमटीएनएलची मक्तेदारी होती.

दूरसंचार क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्यानंतर एमटीएनल या स्पर्धेत मागे पडण्यास सुरुवात झाली.

एमटीएनएलच्या लँडलाईनपेक्षा मोबाइल स्वस्त असल्यामुळे एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे.